मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथे दि. २६ जुलै २०२४ सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता ई.के. टॅलेंट स्कूल यांच्या वतीने आयोजित “मुक्ताई मॅरेथॉन” यात खडसे महाविद्यालयातील बहुसंख्य मुले व मुली खेळाडूनी देखील आपला सहभाग नोंदवला.
नवी मुक्ताबाई मंदिर, बोदवड रोड मुक्ताईनगर, येथून सुरू होणाऱ्या या मॅरेथॉन इव्हेंटला मा. ॲड. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी हिरवा झेंडा दाखवून इव्हेंट ची सुरुवात केली. याप्रसंगी सुरुवातीला उपस्थित सर्व विविध शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना, शिक्षक, पालक वर्ग यांना स्वच्छते विषयी शपथ देण्यात आली. या आयोजित केलेल्या मुक्ताई मॅरेथॉनचा उद्देश आरोग्य, तंदुरुस्ती, मुलींची सुरक्षितता, शहराची स्वच्छता आणि सामुदायिक भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन केले होते.
यात श्रीमती जी. जी .खडसे महाविद्यालयातील क्रीडा विभागातील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला आणि या सामाजिक जाणिवांची लोकांनाही जाणीव व्हावी म्हणून नवी मुक्ताबाई ते गोदावरी मंगल कार्यालयापर्यंत धावत जाऊन हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.या सामाजिक जागरूकता अभियानात खेळाडूंनी आपला खारीचा वाटा उचलत संदेश देण्याचा प्रयत्न केला.या कार्यक्रमात महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. एच.ए. महाजन यांनी देखील उपस्थिती दिली.
यात महाविद्यालयातील अजय वसावे, गणेश दुट्टे, कृष्णा कोकाटे, सुरज पारधी, ज्ञानेश्वर पावरा, करण पाटील, पवन भरगडे, सुमित खोंडले, शिवराज पाटील, ओम मेहंगे व किरण खोंडले या खेळाडूंनी विविध सामाजिक जाणिवेचा संदेश देत मॅरेथॉन इव्हेंट चुरशीची करून उपस्थितांची खेळाडू म्हणून दाद मिळविली. ह्या उपक्रमात भाग्यश्री सोनी, वैष्णवी रत्नपारखी तसेच माजी खेळाडू निखिल यमनेरे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी संघ व्यवस्थापक म्हणून महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांची उपस्थिती होती. अशा प्रकारे महाविद्यालयीन खेळाडूंनी या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.