शाळकरी विद्यार्थ्यांना दप्तर व आरोग्य किट वाटप

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त शाळेतील 1 ते 3 री च्या विद्यार्थ्यांना दप्तर व आरोग्य किट वाटप करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, वक्ते सुरेश कुलकर्णी सर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह अविनाश नेहते होते.

सूत्र संचलन प्रसन्न मांडे यांनी केली.
अरुण कोळी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
कुशाग्र विसावे यांनी सामूहिक गीत गायन केले.
राष्ट्र सेवाविभाग चे पीयूष श्रावगे, श्री. जोशी, अरुण कोळी, निंबा भाऊ सोनवणे, घनशाम बागुल यांनी कार्यक्रम संपन्नतेसाठी परिश्रम घेतले.
प्रसंगी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना चहा व न्याहारी देण्यात आली.
प्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Protected Content