रावेर तालुक्यात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेपासून लाभार्थी वंचित; गॅस सिलेंडर मिळालेच नाही

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील उज्ज्वला योजनेच्या व लाडकी बहीन योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले होते. या योजनेनुसार राज्यातील कुटुंबांना वर्षाला तीन मोफत एलपीजी गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या निर्णयाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून, अद्याप रावेर तालुक्यातील एकाही कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

गॅस सिलेंडरच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांमध्ये नाराजी आहे आणि त्यांनी सरकारकडे तातडीने ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकर न झाल्यास महिलांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे लाडकी बहीन योजनेच्या लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर मोफत गॅस सिलेंडर पुरवण्याची मागणी जोर धरत आहे.सरकारने योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि गरजू कुटुंबांना त्याचा फायदा मिळावा, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त होत आहे.

Protected Content