जळगावला पंतप्रधानांचा कार्यक्रम हा ‘सुवर्ण योग’, प्रशासनाची जय्यत तयारी- पालकमंत्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम हा जळगावकरांसाठी सुवर्ण योग आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. एक लाखापेक्षा अधिक भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी कोणतीही कमतरता राहणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजी घेण्याची सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

जळगाव विमानतळाच्या समोरील ‘ प्राईम इंडस्ट्रीयल पार्क’ येथे होणाऱ्या कार्यक्रमाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. यावेळी राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. २५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘लखपती दीदी संमेलनाला’ येणार आहेत. हा जळगावकरांसाठी सुवर्ण योग आहे. अत्यंत भव्य अशा प्राईम इंडस्ट्रीयल पार्कच्या मैदानावर हा कार्यक्रम होतो आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, हे लक्षात घेवून त्या दृष्टीने कार्यक्रमाची तयारी केली असून त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

Protected Content