रोनाल्डोने सुरू केले यूट्यूब चॅनल; एका दिवसातच मिळवले गोल्डन प्ले बटन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याने यूट्यूबवर सर्वात जलद दहा लाख सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचण्याचा नवा विक्रम केला आहे. त्याच्या चॅनेलने लॉन्च झाल्यापासून एका दिवसापेक्षा कमी कालावधीत १.१ कोटी सबस्क्रायबर्स मिळवले आहेत. हा देखील एक विक्रमच आहे. त्यांच्या चॅनलचे नाव यूआर क्रिस्टियानो आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डोने बुधवार, २१ ऑगस्ट रोजी त्याचे यूआर क्रिस्टियानो चॅनल सुरू केले. चॅनल सुरू झाल्याची घोषणा करताना त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली, ‘प्रतीक्षा संपली. माझे युट्यूब चॅनल अखेर रिलीज झाले आहे! या नवीन प्रवासात सामील व्हा.

रोनाल्डोच्या पोस्टनंतर काही तासांतच १.६९ दशलक्ष चाहत्यांनी चॅनेलचे सदस्यत्व घेतले होते. अवघ्या ६ तासांत चॅनेलच्या सदस्यांची संख्या ६ दशलक्षांपेक्षा जास्त झाली आणि दिवसअखेर १० दशलक्षांचा टप्पा ओलांडला. त्यांचे सदस्य सातत्याने वाढत आहेत. 1 कोटी सबस्क्रायबर्स झाल्यानंतर, रोनाल्डोने आपल्या मुलांना गोल्ड प्ले बटण दाबायला लावले.

Protected Content