अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांनी भरला राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभेच्या पोटनिवडणूकीसाठी महायुतीने एनसीपी कडून नितीन पाटील यांना संधी दिली आहे. आज बुधवारी मुंबई मध्ये दाखल होत नितीन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. नितीन पाटील यांच्यासोबत आज एनसीपी कडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व अन्य नेते होते. 3 सप्टेंबरला होणारी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा महायुतीचा मानस आहे.

नितीन पाटील हे वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. ते सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी वाई येथे पार पडलेल्या सभेत अजित पवार यांनी साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटील यांना खासदार करतो असा शब्द दिला होता. दिलेला शब्द अजित पवार यांनी पाळलेला असून पाटलांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

Protected Content