चिन्या जगताप मृत्यूप्रकरणी पेट्रस गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव सबजेलमध्ये असतांना तपास कामात चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तात्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यासह चार आरोपींनी मारहाण करून खून केल्याचे निष्पन्नात आले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी तात्कालिन कारगृह अधिक्षक पेट्रस गायकवाड याने मंगळवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चिन्या उर्फ रविंद्र जगताप हा एका गुन्ह्यातील जळगाव येथील सबजेलमध्ये असतांना तात्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यासह जितेंद्र माळी, अण्णा काकड अरविंद्र पाटील आणि दत्ता खोत यांनी तपास कामात चिन्या जगताप याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत चिन्या जगताप याचा मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये चिन्या जगताप यांची पत्नी मिनाबाई रविंद्र जगताप यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागत आहे. या गुन्ह्यात फरार असलेला तात्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड हा फरार झाला होता. त्यानुसार २९ जुलै २०२४ रोजी गायकवाड हा जिल्हा पेठ पोलीसांना शरण आला होता. दरम्यान त्यानंतर २० ऑगस्ट रोजी गायकवाड याने जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता न्यायमुर्ती एस.आर. पवार यांनी फेटाळून लावला आहे.

Protected Content