कारचालकाला आला हृदयविकाराचा झटका; रस्त्यावरील चार जणांना उडवले

नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नंदुरबारमध्ये एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. वाहनचालकाचा धावत्या गाडीत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. धावत्या गाडीत वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कार देखील अनियंत्रित झाली. त्यानंतर भरधाव कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या चौघांना उडवले. अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारने रस्ताने सायकलवरुन जाणाऱ्या एका 60 वर्षीय भंगार विक्रेत्याला जोरदार धडक दिला. त्यात त्याचा जागीच मुत्यू झाला. तर रस्त्याने पायी जाणाऱ्या आई आणि मुलाला देखील कारने धडक दिली. दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मिराज सिनेमा ते कोकणी हिल परिसरात ही घटना घडली. वाहन चालक तारीख खान त्यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यानंतर अनियंत्रित कारने सायकलवरून जात असलेल्या रज्जाक खान यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनिषा पवार आणि 12 वर्षीय गोलू पवार हे गंभीररित्या जखमी झाले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Protected Content