एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल शहराजवळील इंग्लिश मीडियम स्कूलजवळ ट्रकने चिरडल्यामुळे पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज १६ ऑगस्ट शुक्रवार रोजी घडली आहे. अविनाश विजयसिंह पाटील वय (५२ ) व पत्नी मिनाबाई अविनाश पाटील वय (४८) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, एरंडोल शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील न्यू इंग्लिश स्कुलसमोर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथून अविनाश विजयसिंह पाटील व मिनाबाई अविनाश पाटील हे दोघी पती-पत्नी पिंपळकोठा येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यसंस्कार आटोपुन परत जात असतांना एरंडोल शहरापासून न्यू इंग्लिश स्कुलसमोर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पुढील तपास उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांना एरंडोल ग्रामीण रूग्णालयत पाठवण्यात आले. गुन्ह्याची कार्यवाही पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उशीरा पर्यंत सुरू होती.
अविनाश पाटील व मीना पाटील हे दोघे पती-पत्नी मूळचे यावल तालुक्यातील निमगव्हाण येथील रहिवासी असून अविनाश पाटील हे राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथे नोकरीस होते, अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. पाटील यांच्या पाश्चात्य दोन मुले आहेत. या गंभीर अपघाताने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे .