नलिन प्रभात जम्मू-काश्मीरचे नवे विशेष डीजी

श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नलिन प्रभात यांची जम्मू-काश्मीरचे नवीन विशेष डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे डीजीपी आरआर स्वेन यांच्या निवृत्तीनंतर ते नवे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील. स्वेन 30 सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. नलिन 1 ऑक्टोबर रोजी डीजीपी पदाचा कार्यभार स्वीकारतील.

प्रभात हे तीन वेळा पोलीस शौर्य पदक विजेते आहेत आणि ते त्यांचे पूर्वीचे कॅडर राज्य, आंध्र प्रदेशमधील विशेष नक्षलविरोधी पोलीस दलाचे ग्रेहाऊंड्सचे प्रमुख होते. सरकारने बुधवारी प्रभात यांचा एनएसजी महासंचालक म्हणून कार्यकाळ कमी केला आणि त्यांना आंध्र प्रदेशातून एजीएमयूटीमध्ये आंतर-कडर प्रतिनियुक्तीचे आदेश दिले.

Protected Content