Home प्रशासन नगरपालिका यावलचा आजचा आठवडे बाजार रद्द !

यावलचा आजचा आठवडे बाजार रद्द !

0
52

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी होणारा आठवडे बाजार रद्द करण्यात आल्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बांगलादेशातील हिंदू समुदायावर करण्यात येत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदचा मोठा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन यावल येथे दर शुक्रवारी भरविण्यात येणारा आठवडे बाजार आज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावलच्या आठवडे बाजारात आपली कृषी उल्पादने विक्रीसाठी आणणारे शेतकरी व व्यापाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे तसेच नागरिकांनी याची दखल घेण्याचे आवाहन देखील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, आजच्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमिवर, कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी तातडीची बैठक घेऊन या संदर्भात पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.


Protected Content

Play sound