न्यू दोस्त गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील गुजराती गल्ली विघ्नेश्वर गणपती मंदिर येथील सालाबाद प्रमाणे या ही वर्षी न्यू दोस्त गणेश मंडळाची बैठक पार पडली. मागील वर्षाप्रमाणे या ही वर्षी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवनवीन सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सादर होतील या वर चर्चा करण्यात आली.

या वर्षी अध्यक्ष म्हणून गणेश महाजन, उपाध्यक्षपदी मोहित महाजन, उपाध्यक्ष पदी चेतन महाजन, सचिव वैभव पाटील, खजिनदार योगेश महाजन, कार्याध्यक्ष किरण महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

मंडळाचे हे 57 वे वर्ष असून मागील 56 वर्षाच्या कारकर्दीत अनेक नवनवीन उपक्रम मंडळातर्फे पारोळा शहरासाठी सादर करीत येत आहे. त्यात सामाजिक सांस्कृतिक व सत्य घटनेवर आधारित नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून हे पारोळा शहराच्या जनतेसमोर सादर करीत आले. तरी प्रत्येक उपक्रमांमध्ये काही तरी नवीन बोध व नवीन आदर्श समाजासमोर मांडले आहेत.

Protected Content