यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात अचानक घराची जीर्ण झालेली भिंत कोसळून गल्लीत खेळणाऱ्या सात वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू नातेवाईकांनी केला ग्रामीण रुग्णालयात आक्रोश
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बु. येथे राहणाऱ्या सात वर्षीय राजरत्न सुपडू बाऱ्हे हा मुलगा खेळत असताना प्रमोद सोनवणे यांच्या घराची जीर्ण झालेली भिंत कोसळून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दाबून गुदमरून जागीच मरण पावल्याची अत्यंत दुदैवी अशी घटना घडली आहे.
दरम्यान सदरच्या जखमी मुलास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रसंगी यावल ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.