हर घर तिरंगा अभियानातंर्गत डॉ. कुंदन फेगडेंच्या हस्ते तिरंगा वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील समाजसेवक व भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे यांच्या माध्यमातुन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत रावेर विधानसभा मतदारसंघात हर घर तिरंगा या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये १३ ऑगस्ट मंगळवार रोजी देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला हर घर तिरंगा अभियानातंर्गत केलेल्या आवाहानतुन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते रावेर यावल मतदार संघातील रोझोदा, खिरोदा, सावखेडे बु. व कुंभारखेडे येथे तिरंगा वितरण कार्यक्रम संपन्न झाले.

ह्यावेळेस प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी देशभक्त नागरिकांना आवाहन केले नागरिकांमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिसून आला. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात केली. तेव्हा पासून येणाऱ्या प्रत्येक वर्षी ९ ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त सदर अभियान राबवले जात आहे. भारतीयांमध्ये देशभक्ती,राष्ट्रा विषयी कृतज्ञ भाव जागृत करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट्ये आहेत. यावेळी राझोदे येथील उपसरपंच चेतन भारंबे, सदस्य निखिल सोरोदे, हर्षल सोरोदे, भुषण राणे,रोशन धांडे, मनिष लोहार, मोहन मेढे, निपुण धांडे, मानस धांडे, ललित फेगडे, गोवर्धन ढाके, पंकज इंगळे, उमेश इंगळे, नानू माळी, पंकज झोपे, गिरीश झोपे. कुंभारखेडा येथील प्रदीप पाटील उपसरपंच माधव चौधरी, शांताराम राणे, पंडित महाजन, हरीश चौधरी, निलेश पाटील, युवराज पाटील, गंगाराम राणे इत्यादी उपस्थिती होते.

Protected Content