भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू

गोंदिया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गोंदिया शहरातील कुडवा जवळील राणी अवंतीबाई चौकात एक शिक्षिकेच्या दुचाकी वाहनाला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. एका प्रत्यक्षदर्शी ने सांगितलेल्या माहितीनुसार सदर भरधाव ट्रक ने महिला शिक्षिकेला काही अंतरापर्यंत चिरडत नेले यात शिक्षिकेच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अल्विना जेम्स लुईस (वय ३१ वर्ष रा. अरिहंत कॉलोनी कुडवा, गोंदिया) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.

ही शिक्षिका गोंदिया इथून अंभोरा येथील शाळे मध्ये जात असताना अवंतीबाई चौक या ठिकाणी तिरोडा कडून बालाघाट टी पॉईंट कडे जात असताना अवंतीबाई चौक या ठिकाणी एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने शिक्षकेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काही काळासाठी परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झाला होता. घटनास्थळी एकत्र झालेले नागरिक शहरातील वाहतूक व्यवस्था आणि या चौकात लावण्यात आलेल्या अवैध फलका मुळे वळण घेताना निर्माण झालेलीअदृश्यता ला कारणीभूत ठरवीत होते. तणाव वाढत असताना मात्र रामनगर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत ट्रक व चालक याला ताब्यात घेतल्यामुळे हा तणाव निवळला आहे.

Protected Content