अतिवृष्टीमुळे ‘या’ रेल्वे गाड्यांच्या नियोजनात बदल !

Train

भुसावळ प्रतिनिधी । मुंबईत सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या असून काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये भरपूर जोरात पाऊस असल्यामुळे दिनांक ३ जुलै रोजी काही एक्सप्रेस रद्द केल्या आहेत. यात गाडी क्रमांक १२११८ अप आणि १२११७ डाऊन मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोदावरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२१०२ अप आणि २२१०१ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेली आहे. दरम्यान, गाडी क्रमांक ११०२५अप आणि ११०२६ डाऊन भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस या गाडीच्या मार्गात आज बदल केला असून ही ट्रेन मनमाड व दौंड या मार्गाने जाईल. गाडी क्रमांक १२१४० अप नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही आज नाशिक स्टेशनपर्यत चालविण्यात येणार आहे. तर गाडी क्रमांक १२१३९ डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस दिनांक ३ रोजी मुंबई ऐवजी नासिक ते नागपूर पर्यत चालविण्यात येणार आहे.

Protected Content