धाडस सामाजिक संघटना व गोदावरी फाउंडेशनतर्फे भोकर येथे मोफत आरोग्य शिबिर

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धाडस सामाजिक संघटना आणि गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच जळगाव तालुक्यातील भोकर येथे गावात मोफत आरोग्य शिबिर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले.

भोकर गावातील आणि इतर परिसरातील नागरिकांना मोफत उपचार व्हावे यासाठी धाडस सामाजिक संघटना आणि गोदावरी फाउंडेशनच्या वतीने संयुक्त उपक्रम राबवित मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या शिबिरात 40 प्रकार होऊन अधिकाऱ्यांवर मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जवळपास अडीच हजार रुपये पर्यंत लागणारे आरोग्य चाचणी ईसीजी शुगर आदींची मोफत तपासणी करण्यात आली शिवाय मोतीबिंदू, नाक, कान, घसा, गर्भपिशवी शस्त्रक्रिया शिबीर, महिलांच्या विविध प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी, दारूमुळे झालेले आजार मोफत तपासणी, मेंदू,मणका, हाडांचे विकार, शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची गाठीसाठी तपासणी, शस्त्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट, कर्करोग, अस्थीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया, मूळव्याध, स्वादुपिंड,भगंदर, हर्निया, अल्सर या आजारांची तपासणी करून जवळपास 200 हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून दिली. त्यामुळे पंचक्रोशीतील गरजवंत यांनी आनंद व्यक्त केला.

या आरोग्य शिबिरासाठी मुंबई येथील सचिन आजबे यांच्यासह ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू भंगाळे महानगर अध्यक्ष शरद तायडे, लकी अण्णा, निलेश चौधरी, भगवान धनगर, गुलाबराव कांबळे होते.

शिबिर यशस्वीतेसाठी दिलीप भागो बाविस्कर, प्रभाकर कोळी, चंद्रभान पवार, विलास सोनवणे, समाधान वाघ,नअशोक पाटील, एकनाथ सैनदाने, विशाल सोनवणे, दीपक पवार, पुंडलिक सोनवणे, मंगल सपकाळे, जगदीश सोनवणे, मच्छीन्द्र सोनवणे, मोहन चावडा यांनी परिश्रम घेतले.

Protected Content