विधानसभा निवडणूकीत मदत करा; फडणवीसांची संघाकडे मागणी

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री नागपुरात बैठक झाली. गेल्या 5 जूनपासून संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि फडणवीस यांच्यातील ही चौथी बैठक आहे. नागपूरच्या बीआरए मुंडले शाळेत झालेल्या या बैठकीच्या विषयाबाबत संघ किंवा फडणवीस यांच्याकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार विधानसभेत संघाची मदत हवी यासाठी वारंवार आळवणी केली जात आहे. संघाकडूनही कानपिचक्या देत लोकांत मिसळून काम करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश संपादित करता आलेले नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात पक्षाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे लोकसभेतील पराभवाची सावली आगामी निवडणुकीवर पडू नये यासाठी भाजप आणि संघाच्या पातळीवर प्रयत्न होत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 5 जून रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली.

Protected Content