Home राजकीय पुण्यातील ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्याचे काँग्रेसमध्ये गुपचुप प्रवेश

पुण्यातील ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्याचे काँग्रेसमध्ये गुपचुप प्रवेश


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे येथील ज्येष्ठ पदाधिकारी अविनाश साळवे यांनी शुक्रवारी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना पुणे कँटोन्मेंटमधून काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

अविनाश साळवे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अत्यंत गोपनियता बाळगण्यात आली होती. त्यांच्या पक्षप्रवेशाला फाटे फुटू नयेत, यासाठी काँग्रेसमधील एका गटाने पूर्ण काळजी घेतली. मुंबईत चेन्निथला यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतरच ही वार्ता राजकीय वर्तुळात पसरली. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे कँटोन्मेंटमधून उमेदवारीचे दावेदार समजले जाणारे माजी मंत्री रमेश बागवे यांचा पत्ता कापला जाणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. बागवे हे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.


Protected Content

Play sound