पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस ऑलिम्पकमध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे. ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या लढतीमध्ये भारतानं स्पेनचा 2-1 ने पराभव केला.भारतीय टीम सुरुवातील पिछाडीवर होती. पण, भारतानं त्यानंतर जोरदार कमबॅक करत 2 गोल केले आणि विजेतेपद पटकावले. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी टीमने ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भारताने ब्रॉन्झची कमाई केली होती.
भारत आणि स्पेन हाफ टाईमपर्यंत 1-1 ने बरोबरीत होते. मार्क मिरालेसने गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली होती. भारताकडून पहिला गोल हरमनप्रीत सिंहने 30 व्या मिनिटाला केला. त्यानंतर हरमनप्रीतने 33 व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. भारताच्या अनेक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोलकिपर पीआर श्रीजेशचा हा शेवटचा सामना होता. श्रीजेशनं या सामन्यातही चपळ गोलरक्षण केलं. त्यानं स्पेनचे अनेक हल्ले परतावून लावले. अगदी शेवटच्या क्षणी स्पेनचा प्रयत्न रोखत भारताच्या ब्रॉन्झ मेडलवर शिक्कामोर्तब केले.