राहुल गांधी यांचा २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौरा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपली तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या वतीने देखील बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. ते २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात येणार आहे. या दौऱ्यात ते राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबतच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते जागा वाटपात सर्वाधिक जागांवर दावा करत आहेत. या संदर्भात देखील राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

Protected Content