Home Cities अमळनेर अमळनेरात लैंगिक कामगारांना येणाऱ्या समस्या व कायदेशीर चौकट चर्चासत्र

अमळनेरात लैंगिक कामगारांना येणाऱ्या समस्या व कायदेशीर चौकट चर्चासत्र

0
94

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरातील हॉटेल मिड टाऊन येथे ७ ऑगस्ट २०२४ रोजी सेक्स वर्क करणाऱ्या महिलांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर, संग्राम संस्था सांगली, स्वाधार महिला संघ, अमळनेर, आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर, आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चा सत्राचा मुख्य उद्देश १९ मे २०२२ रोजी भारताच्या सर्वोच्य न्यायालयाने लैंगिक कामगारांच्या अधिकारांच्या बाबतित निर्देश जारी केले आहेत. सर्व सेक्स वर्कर्सना संविधाना नुसार सन्मानाचे जीवन कसे जगता येइल या विषयी सुमीम कोर्ट पॅनलने न्यायालयाला तपशिलवार शिफारसी केल्या आहेत.

सदर चर्चासत्राच्या कार्यक्रमात विधिसेवा प्राधिकरणचे जळगाव जिल्हयातील वकील प्रतिनिधी, जळगाव जिल्हा व शहरातील पोलिस अधिकारी, सेक्स वर्कर सोबत कार्य करणाऱ्या विविध सामाजीक संस्थेचे प्रतिनिधि, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी व लैंगिक कामगार प्रतिनिधी आणि जिल्हा एडस, नियंत्रण कार्यालयाचे प्रतिनिधी, मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते. या चर्चा सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणुन विधि सेवा प्राधिकरण जळगाव, यांचे सचिव सय्यद उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड ललिता ताई पाटील उपस्थित होत्या. उद्घाटन प्रसंगी प्रांत अधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदवाळकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्षचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले, विप्रोचे एच. आर. मॅनेजर चेतन थोरात, ॲडव्होकेट शकील काजी, पोलीस निरीक्षक विकास देवरे, आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद यांची उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या सुरूवातील उद्घाटन सत्रामध्ये मान्यवरच्या हस्ते सर्वोच्च न्यायालय यांचे आदेश पुस्तिकेचे शिदोरी स्वरूपात टोपली उघडुन करण्यात आले. याप्रसंगी सेक्स वर्कर्स महिलांच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.आधार बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा उद्देश, आधार आणि स्वाधार संघ यांचे सेक्स वर्कर महिलां साठीचे मागील २५ वर्षातील केलेल्या कामाची ओळख करून दिली.

सांगली येथील संग्राम संस्थेच्या प्रकल्पाधिकारी किरण यांनी लैंगिक कामगार भगिनीच्या समस्या वर प्रकाश टाकला. यानंतर प्रमुख मार्गदर्शक अँड ललिताताई पाटील यांनी सेक्स वर्कस महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सुप्रीम कोर्टाने दिलेले दिशा निर्देश, त्यावर आपण अजून काय सूचना देऊ शकतो यावर प्रकाश टाकला. १९ मे रोजी सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना या बाबतित सविस्तर मांडणी केली. त्यानंतर पोलिस प्रतिनिधी म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदवाळकरयांनी सेक्स वर्कर महिलांना होणाऱ्या पोलीस कार्यवाहीत यापुढे आम्ही या निर्देशांचे पालन करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, जळगाव ट्रॅफिकिंग युनिटचे पोलिस निरीक्षक शितळकुमार नाईक, अमळनेर चोपडा आणि पारोळा येथील पोलीस अधिकारी कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती होती. जळगावच्या विधि सेवा प्राधिकरणचे सचिव सय्यद यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विधी सेवा मार्फत सुरु असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व सेक्स वर्कर महिला च्या बाबतीत असलेल्या कायदयांची अंमलबजावणी करत असतांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन कसे करावे, व महिलांनी जास्तीत जास्त प्रशिक्षण व माहिती घेऊन सक्षम व्हावे असे आवाहन केले. तसेच महिलांना काहीही कायदेविषयक मदत लागली तरी त्यांनी जिल्हा विधी प्राधिकरण शी संपर्क साधावा असे आवाहन केले,

सदर चर्चा सत्रामध्ये सुमारे १०५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमात आलेल्या लैंगिक कामगार भगिनी यांच्या वतीने फरिदा काझी , संध्या ताई,सीमाताई यांनी त्यांच्या सोबत घडलेले प्रसंग सांगितले, तसेच यंत्रणे कडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यानंतर चर्चासत्र सर्वांना खुले केले गेले. यामध्ये अमळनेर चोपडा व पारोळा येथील वकील संघ प्रतिनिधीनीं आपल्या भूमिका चर्चासत्रात सहभागी होऊन मांडल्या. ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील कौन्सिलर, माध्यम प्रतिनिधीं मान्यवरांनी चर्चासत्रात आपले मते व दृष्टिक्षेप टाकून सकारात्मक चर्चा घडवुन आणली.

सदर चर्चा सत्राला यशस्वी करण्याकरिता जळगाव जिल्हा विधी सेवा समितीचे सुभाष चंद्र पाटील, जावेद पटेल आणि आधार बहुउद्देशिय संस्था, स्वाधार महिला संघ, संग्राम संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रा. विजय कुमार वाघमारे यांनी आधार संस्था राबवित असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती देऊन, भारतातील सेक्स वर्कर महिलांची सामाजीक परिस्थिती यावर सविस्तर विवेचन केले.


Protected Content

Play sound