Home Cities यावल फैजपूरच्या नव्या प्रांताधिकारी यांचा डॉ. कुंदन फेगडे यांच्याकडून स्वागत

फैजपूरच्या नव्या प्रांताधिकारी यांचा डॉ. कुंदन फेगडे यांच्याकडून स्वागत


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपुर विभागीय प्रांत अधिकारी म्हणुन बबनराव काकडे यांनी पदाची सुत्रे सांभाळली असुन, यावल येथील भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे यांनी कार्यालयात भेट देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

फैजपुर तालुका यावल विभागाच्या प्रांत अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी प्रांत अधिकारी देवयानी यादव यांची उतरप्रदेश येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या प्रांत अधिकारी पदावर बबनराव काकडे यांची नेमणुक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे यांनी फैजपुर येथे रूजु झालेले नुतन प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

एक चांगले व कार्यतत्पर अधिकारी म्हणुन ओळख असलेले प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासुन नागरीकांचे विद्यार्थ्यांचे तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामे व विविध दाखले व आदी कामांना आता गती मिळेल अशी अपेक्षा डॉ कुंदन फेगडे यांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound