Home राजकीय विधानसभा निवडणूकीसाठी मनसेचा तिसरा उमेदवार जाहीर

विधानसभा निवडणूकीसाठी मनसेचा तिसरा उमेदवार जाहीर


लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील २५० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सोलापूर आणि शिवडी येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली होती. उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे.

लातूर जिल्हा दौऱ्यात त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी जाहीर केलेला हा तिसरा उमेदवार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावाची घोषणाच थेट राज ठाकरे करत आहेत. त्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात संतोष नागरगोजे हे निवडणुकीला सामोरे जातील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.


Protected Content

Play sound