पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते व खा. स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कामाच्या माध्यमातून २० ते २२ गावांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान सदर कामांतर्गत पांझरा नदीवरील सुकवद गावापासुन मांडळ गावापर्यंत बंधारा व कालव्याव्दारे पाणी भाल्या नाल्यात टाकणे (मांडळ- मुड़ी फंडबंधारा) दुरुस्ती व पुनर्भरण करणे, रक्कम १ कोटी २९ लाख रुपये आणि पांझरा नदीवरील हेकळवाडी गावापासून मांडळ गावातून व्हाया मुडी गावापर्यंत बंधारा व कालव्याव्दारे पाणी लवकी नाल्यात टाकणे, (मुडी फंडबंधारा) दुरुस्ती व पुनर्भरण करणे, रक्कम ३ कोटी ७९ लाख या दोन्ही कामाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान पांझरा नदीवरुन कालव्याव्दारे भाला नाला व लवखी नाल्यावरील पांझरा पाठचाऱ्या पुनर्जीवन करून मांडळ-मुडी परिसरातील २० ते २२ गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्यामुळे शेतकरी राजा आनंदीत झाला आहे. यावेळी एच.एल.पाटील यांनी या पाठचाऱ्या मुळे शेतकऱ्यांना किती फायदा होईल त्याची माहिती दिली.

याप्रसंगी माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील, संगिता भिल, चंद्रसेन पाटील भागवत पाटील, मंदाबाई पाटील, अशोक पाटील, प्रा.सुरेश पाटील, अनिल शिसोदे, अशोक पाटील, समाधान धनगर, डॉ.रामराव पाटील, संजय पाटील, विजय जैन, संजय पाटील, उदय पाटील, बापु बडगुजर, उदय पाटील, हेमंत पाटील, गजु महाराज, एच.एल.पाटील, नारायण पाटील, पंढरीनाथ पाटील, पंकज पाटील, राजेंद्र पाटील, पिंटू पाटील, गणेश भोई, शांताराम नाना, बोदर्डे येथिल विकास पाटील, प्रफुल्ल पाटील, पंढरीनाथ पाटील, महेद्र पाटील, किशोर पाटील, शांताराम पाटील, गोकुळ पाटील, मधुकर पाटील व पांझरा परिसरातील ग्रामस्थ मंडळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक व महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव उदय पाटील, गुणवंत पाटील, विजय जैन, प्रणव पाटील, नाना पाटील, तुषार पाटील यासह ग्रामस्थानी परिश्रम घेतले, मा.आर.एफ.ओ. पी.पी.सुर्यवंशी, ग्रा.प.सदस्य विक्की सुर्यवंशी, व प्रा.ज्ञानेश्वर सुर्यवंशी सर यांनी मनोगत व्यक्त केले, सुत्रसंचलन गुणवंत भैय्या पाटील यांनी केले.

Protected Content