अन्वर खाटीक यांना शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष करण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील शरद पवार गटाचे निष्ठावंत पदाधिकारी अन्वर खाटीक यांना शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे.

सध्या शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावरून मोठी उत्सुकता लागली आहे. यासाठी अनेक नावे समोर येत असून आता फैजपूर येथील अन्वर खाटीक यांना हे पद मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. रावेर लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाच्या वतीने आज पर्यंत या क्षेत्रातील मुस्लिम व मागासवर्गीय समाजाला प्रमुख पदांवर पक्षा अंतर्गत संधी मिळालेली नसल्याने अल्पसंख्यांक समाजातील अनवर खाटीक यांना संधी दिली तर रावेर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला न्याय देण्यासारखं होईल. जळगाव शहराला अल्पसख्यांक चेहरा देण्याचा जरी पक्षांतील नेत्यांचा विचार असेल तरी ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला त्याचा काही फायदा होणार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अनवर खाटीक हे मुस्लिम खाटीक समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे फैजपूर शहराध्यक्ष पदावर कार्य करीत आहे. खाटीक यांचे पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहे. रात्र दिवस पक्षाच निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून अनवर खाटीक यांची ओळख आहे. स्थापनेपासून शरदचंद्र पवार यांच्या विचारांचे पाईक आहेत.

लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका व अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नि स्वार्थपणे स्वःताला वाहुन घेणारा कार्यकर्ता म्हणुन आपली ओळख निर्माण केली असुन खाटीक यांनी कधीही पक्ष नेतृत्वा कडे आजपर्यंत काही मागितलेले नाही. असा हा नि:स्वार्थपणे कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून अनवर खाटीक यांना पक्षात जिल्हा कार्याध्यक्षपद देवुण पक्ष मुस्लिम अल्पसंख्यक समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा रावेर लोकसभा मतदारसंघातील अनवर खाटीक यांचे समर्थक भुसावळ येथील ईलीयास मेमन, चोपडा येथील नईम शेख,यावलचे अय्युब खान सर ,जामनेर चे माजी उपनगराध्यक्ष जावेद मुल्लाजी,रावेरचे राजु शेख,फैजपुर चे माजी नगरसेवक शेख जफ्फर शेख अजगर, मुक्ताईनगरचे अमिन खान ,रसलपुर चे फैय्याज शेख यांच्यासह मागासवर्गीय अल्पसंख्यक समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content