अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शेताकडे पायी जात असलेल्या शेतकरी जखमी झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. गुलाब तुकाराम पाटील (वय ५५, रा. म्हसले ता. अमळनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुलाब पाटील हे आपल्या आईवडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी ३० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ शेताकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरात धडक दिली. या धडकेत ते जबर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
तेथून बुधवारी ३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारदरम्यान संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकीय पथकाने मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरू होते.दरम्यान धडक देणारे अज्ञात वाहन कोणते हा आता पोलीस तपासचा भाग आहे.