Home Cities चोपडा चोपडा रोटरॅक्ट क्लब अध्यक्षपदी डॉ.ललित चौधरी तर सेक्रेटरीपदी प्रणय टाटीया

चोपडा रोटरॅक्ट क्लब अध्यक्षपदी डॉ.ललित चौधरी तर सेक्रेटरीपदी प्रणय टाटीया

b914a594 393c 4dbe 983e 6c86fc604109
b914a594 393c 4dbe 983e 6c86fc604109

b914a594 393c 4dbe 983e 6c86fc604109

चोपडा (प्रतिनिधी) समाजसेवेच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व निर्मितीच्या विशिष्ट उद्देशाने झटणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोटरी चळवळीच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा शाखेच्या अध्यक्षपदी धन्वंतरी डॉ. ललित चौधरी तर सेक्रेटरीपदी ज्वेलर्स व्यावसायिक प्रणय टाटीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 

तसेच उपाध्यक्ष जावेद शेख तर कोषाध्यक्ष म्हणून मयंक जैन हे काम पाहणार आहेत. बुधवारी (दि.३ जुलै) आनंदराज पैलेस येथे होणाऱ्या एका समारंभात त्यांचा विधीवत पदग्रहण सोहळा संपन्न होईल. प्रांत ३०४० चे प्रांतपाल धीरेन दत्ता व माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. याचवेळी रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन जैन व सेक्रेटरी धीरज अग्रवाल तसेच इनरव्हील क्लबचाही पदग्रहण सोहळा होणार आहे.

प्रांतीय स्तरावरील चोपडा शाखेच्या पूर्वाश्रमीच्या ख्याती व कर्तुत्वाला अनुसरूनच त्या अनुरूप अशीच आमची कारकीर्द असेल, अशी ग्वाही डॉ. चौधरी व प्रणय टाटीया यांनी दिली आहे. समारंभास उपस्थितीचे आवाहन मावळते अध्यक्ष सागर नेवे व सेक्रेटरी दिव्यांक सावंत यांनी केले आहे.


Protected Content

Play sound