श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद राहणार

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थानच्यावतीने एक ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची विशेष (व्हीआयपी) दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे.त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावणात भाविकांची संख्या नेहमीपेक्षा कित्येक पटीने वाढते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. या काळात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

श्रावणातील सोमवारी पहाटे चार वाजता म्हणजे एक तास अगोदर मंदिर खुले केले जाणार आहे. दर्शनासाठी ताटकळणारे भाविक आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांमध्ये काही वेळा वाद होतात. सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार देवस्थानने श्रावण महिन्यात शासन, जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार होणाऱ्या राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व विशेष (व्हीआयपी) दर्शन१० सप्टेंबरपर्यंत बंद केले आहे.

Protected Content