जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संभाजी नगर चौकात दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रध्दा ज्ञानेश्वर महाजन वय ३० रा. रायसोनी नगर,जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता त्या स्कूटी क्रमांक (एमएच १९ डीए २५८२) ने घरी जाण्यासाठी निघाले. संभाजी नगरातून जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमव्हीडी १६६८) ने जोरदार धडक दिली. या अपघातात श्रध्दा महाजन या महिला गंभीर जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी महिलेने रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वार संदीप मधुकर पाटील वय ४४ रा. कोल्हे हिल्स, जळगाव आणि शंकर बहादूर नन्नवरे रा. समता नगर, जळगाव यांच्यावर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.