यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातुन गेलेल्या बर्हारपूर- अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्यावर पावसाळयात एका बाजुला पाऊसाचे साचलेले पाणी तर दुसर्या बाजुला खड्डे निर्माण झाले असुन वाहनचालकांना वाहन चालवितांना करावी लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावल येथील बस स्थानक व अन्य ठिकाणी जाण्यासाठीचा एकमेव प्रमुख म्हणजे बर्हाणपुर ते अंकलेश्वर हा महामार्ग होय. यावर पादचार्यांपासुन तर इतर वाहनांची प्रतिदिन मोठी वर्दळ असते. दरम्यान गेल्या दहा दिवसापासुन पाऊसाची रिपरिप सुरू असल्याने या मार्गावर दुभाजच्या एका बाजुला मध्यभागी मोठे खड्डे निर्माण झाले असुन तर दुसर्या बाजुला मार्गावरील रस्ता दाबला गेला असुन त्या ठिकाणी पाऊसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यामुळे वाहनचालकांना आपली वाहने काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच, पादर्यांसह इतर सर्व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे.
संबधीत राज्य महामार्गा वरील देखरेख करीता नेमणुकीस असलेल्या अधिकार्यांनी अपघात होण्या आदीच तात्काळ या मार्गावरील खड्डे बुजुन दुसर्या बाजुला साचणार्या पाण्याचा मार्ग काढावा अशी मागणी वाहनधारक व नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.