सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकाच दिवशी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सर्वोच्च न्यायालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना नोटीस जारी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण या दोन्ही महत्त्वाच्या प्रकरणांवर यापुढे एकाच दिवशी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ३ सप्टेंबरला होण्याची शक्यता असून त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दोन्ही बाजूंचे आमदार पात्र ठेवले होते. त्यांच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात तर शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणातही विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठेवले होते. याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Protected Content