सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाला पाठवली नोटीस

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला विचारलेला प्रश्न चर्चेत आला आहे. तुम्हाला अपात्र का ठरवू नये? असा सवाल चंद्रचूड यांनी केला आहे. ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे. सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले याबाबत ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे. अजित पवारांना विचारले आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये, असा सवाल धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला केला असल्याचं ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली त्याचा निर्णय त्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिला. चार आठवड्यात या नोटिशीला उत्तर द्यायचे आहे. ही मुदत त्यांना देण्यात आली आहे. शिवसेनेचे जे आमदार अपात्रता प्रकरण आहे त्याबरोबरच हे प्रकरण घेतले जाईल असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकापाठोपाठ घेतली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर कुणाला अपात्र ठरवलं तर त्यांची अपात्रता ११ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

Protected Content