कोथळीत उपयुक्त किटक व त्यांच्या फायदेविषयी मार्गदर्शन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील, दीक्षा सोनवणे, स्नेहल इरसे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कोथळी येथे शेतात फायदेशीर कीटक व त्यांचे व्यवस्थापन तंत्रज्ञाना बद्दल माहिती दिली.

काही कीटक कीटकांचा प्रसार रोखून आपल्याला मदत करतात. फायदेशीर कीटक, जसे की लेडीबर्ड बीटल, ऍफिड मिडजेस, मधमाश्या, बंबल बी, मेसन बी, लीफकटर बी आणि फुलपाखरे, नैसर्गिक पारिस्थितिक प्रणाली आणि परागीभवन नियंत्रण सेवा देतात. जसे की नैसर्गिक शत्रू, माती बिल्डर्स, तण मारणारे, सफाई कामगार असणारे कीटक म्हणजेच मधमाशी, लेडीबर्ड बीटल, बंबल बी, फुलपाखरू हे आपल्याला उत्पादन वाढीसाठी तसेच इतर ठिकाणी उपयुक्त ठरतात. या बाबतीत कृषीकन्यांनी मार्गदर्शन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए डि मत्ते व समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content