पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकर फायनलमध्ये

पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिसऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याआधी भारताचे पुरुष खेलाडू या प्रकारात क्वालीफायर फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. मनू भाकरने जोरदार प्रदर्शन करत अचूक निशाणा साधत पदकावर दावा ठोकला. टॉप ८ मध्ये राहणाऱ्या नेमबाजांना अंतिम फेरीत स्थान मिळते. एकूण ५८० अंकांसह मनूने तिसऱ्या स्थानावर रहात अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. उद्या रविवारी दुपारी ३.३० वाजता ती अंतिम फेरीत खेळेल. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा आहे.

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्टल इव्हेंटच्या सुरुवात जबरदस्त करत पहिल्या तीन सीरीजनंतर दुसऱ्या नंबरवर पोहोचली. तसेच भारताची आणखी एक नेमबाज रिदिमा सांगवान २४ व्या स्थानी घसरली. चौथ्या सीरीजनंतर मनू तिसऱ्या स्थानी पोहोचली. पहिल्या तीन सीरीजमध्ये तिने ९७, ९७, ९८ स्कोर केला होता, तर चौथ्या सीरीजमध्ये ९६ स्कोर केला. रिदिमा सांगवानने पुनरागमन करत २४ व्या स्थानावरून १६ व्या स्थानावर पोहोचली.मात्र,ती अंतिम फेरीत पात्र ठरू शकली नाही. २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथेझालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.

Protected Content