धर्मवीर – २ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बहुप्रतीक्षित धर्मवीर २ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच कळवू असेही ते म्हणाले आहेत. प्रवीण तरडे यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्या मागचे कारणही सांगितले आहे.

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता “धर्मवीर – 2” हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू,’ असे त्यांनी सांगितले.

Protected Content