जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या आठ गुन्ह्यांची उकल करून संशयित आरोपींना मुद्देमालासह जप्त करण्यात आले आहे. @एलटीएन यात यात डिझेल चोरी करणारी टोळी, रस्त्या आडवून रोकड लांबविणारी, पैशांच्या बॅगांची चोरी, दुचाकी व सायकली चोरी, महागड्याचार चाकी वाहन कमी किमतीत विक्री प्रकरण, मालट्रक चोरी प्रकरणा, ठगबाजी करणारा गुन्हा आणि गावठी पिस्तूलासह जीवंत काडतूस प्रकरणांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
1. दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह संशयिताला अटक
वरणगाव शहरातील आंबेडकर नगरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या हरीश उर्फ हर्ष राहुल उजलेकर वय-१९ रा. आंबेडकर नगर, वरणगाव याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक ४० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, उदय कापडणे, रवींद्र चौधरी यांनी केली. पुढील कारवाईसाठी त्याला वरणगाव पोलिसांचा ताब्यात देण्यात आले.
२. ठगबाजी करून सोन्याचे दागिने लांबविणारा संशयित जेरबंद
अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठगबाजी करून सोन्याची अंगठी चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिगंबर कौतिक न्हावी उर्फ मानकर याला गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोहेकॉ दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी जळगाव शहरातील आसोदा रोडवरील हरिओम नगरातील बोर्डाजवळ अटक केली. @एलटीएन करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची सोन्याची लगड व अंगठी जप्त केले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
3. दहा चाकी मालट्रक एलसीबीकडून जप्त
फैजपूर पोलीस ठाण्यात मालट्रक (एमएच १९ झेडए ५१८१) चोरी झाल्याच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक हा मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुभाटी गावाजवळील खलटाका थाना पोलीस चौकीत ट्रक जमा असल्याचे मिळून आले. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ संदीप पाटील, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, प्रवीण मांडोळे, बबन पाटील, महेश सोमवंशी यांनी प्रक्र क्रमांक (एमएच १९ झेडए ५१८१) हा गुन्हा कामी जप्त केला आहे
4. महागड्या चारचाकी गाड्या चोरून कमी पैशात विक्री: सराईत गुन्हेगाराला अटक
अजिंठाचौफुली ते आकाशवाणीचौक परिसरात महागड्या गाड्या संशयास्पद फिरत होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई केली आहे. यात महागडे ३ वाहने जप्त केले आहे. यात १२ लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा, १५ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची हॅरियर आणि ४ लाख रुपये किमतीची मारुती बनेलो अशा ३ गाड्यांचा समावेश आहे. @एलटीएन एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, कॉन्स्टेबल विनोद पाटील, गजानन देशमुख, मुरलीधर धनगर, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील, प्रदीप चौरे, दीपक चौधरी यांनी कारवाई करत संशयित आरोपी मजहर रशीद पिंजारी वय-४३, रा. सलार नगर, जळगाव यांच्याकडून या तीनही वाहने जप्त केले आ. या तीन वाहनांवर बनावट नंबर प्लेट लावून महागडी गाडी कमी किमतीत विक्री करत असल्याचे निष्पन्नात आले. दरम्यान यातील दोन गाड्यांच्या चोरीप्रकरणी दिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात अजून संशयित आरोपीकडून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
5. सराईत दुचाकी व सायकल चोरी करणारे २ सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि सायकलींची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ दुचाकी आणि १९ सायकली जप्त केले आहे. याप्रकरणी भूषण जगन्नाथ माळी वय-४० आणि विशाल विश्वनाथ माळी वय-२८ दोन्ही रा. वरणगाव ता.भुसावळ यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ५ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. @एलटीएन या दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भूषण शेलार, दीपक चौधरी यांनी केले.
6. रस्त्यावर लुटमार करणारे तिघे पोलीसांच्या ताब्यात; मुद्देमाल जप्त
विक्री केलेल्या मालाची रक्कम घेऊन दुचाकीने घरी परतत असतांना यावल ते फैजपूर रस्त्यावर दुचाकी आडवून दोन जणांनी धाक दाखवत सोबतची ३९ हजार ७०० रूपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी फरदीन कबीर पटेल वय-२४, रा. आयेशा नगर यावल, सोहेल रुबाब पटेल वय-२३ रा. विरार नगर, यावल आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना ताब्यात घेतले. @एलटीएन त्यांच्याकडून चोरीला गेलेली रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनि हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, विनोद गाभणे, स.फौ. विजय चौधरी, पोहेकॉ राहुल नावकर, स.फौ.असलम खान यांनी केली आहे.
7. पैशांची बँग लांबविणाऱ्या टोळीतील म्होरक्याला अटक
पारोळा गावातील एसबीआय बँकेसमोर पैशांची बॅग लांबवणारे टोळी पुन्हा सक्रिय झाले असून त्याच परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील व पोलीस नाईक भगवान पाटील यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पोलीस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील आणि प्रमोद ठाकूर या पथकाने सापळा रचून पारोळा शहरातून संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया याला अटक केली. @एलटीएन त्याच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड मिळून आली. दरम्यान त्याने दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एसबीआय बँक परिसरात त्याच्यासाठी रिशी सिंगदर सिसोदिया व विशाल उर्फ मोगली सिसोदिया दोन्ही रा.गूलखोडी ता. पाचोर जिल्हा राजगढ यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे.