Home Cities रावेर नगरसेवकाने केली बिघडलेल्या हातपंपाची दुरूस्ती !

नगरसेवकाने केली बिघडलेल्या हातपंपाची दुरूस्ती !

0
27
raver tubewell

raver tubewell

रावेर प्रतिनिधी । शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी बंद पडलेल्या हातपंपाची दुरूस्ती केल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरातील शिवाजी चौक परिसरातील लोकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती. अनेक महिलांना शेतमजूरीचे काम सोडून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. याची दखल घेऊन या भागातील नगर सेवक राजेंद्र महाजन यांनी स्वखर्चाने मागील अनेक वर्षा पासून बंद पडलेला हातपंप दुरुस्त करून त्याचे ट्यूबवेल मध्ये रुपांतरीत करून या पंप ला परत सुरू केले. याला पाणी लागले असून या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound