दोन जणांना मारहाण करून लुटले; अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेक्सा शोरूमच्या पाठीमागील भोलेबाबा मंदिराजवळ दोन मित्रांना बेदम मारहाण करून चांदीचे दागिने आणि मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सोमवारी २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, समीर कमरोद्दिन शेख वय-२३, रा.मेहरून, जळगाव हा तरुण सोमवारी २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता त्याचा मित्र डुबऱ्या याच्यासोबत जळगाव शहरातील नेक्सा शोरूमच्या पाठीमागील भोलेबाबा मंदिराजवळ गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी अज्ञात दोन जण त्यांच्याजवळ ठेवून त्यांना मारहाण करत समीर शेख याच्या हातातील मोबाईल आणि चांदीचे दागिने जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेबाबत मंगळवारी २३ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.

Protected Content