रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाल गावाजवळील खरगोन रोडवरील पार्किंगमध्ये लावलेली फोर्ड कंपनीची सिल्वर रंगाची क्रुझर फोरव्हीलर गाडी चोरीला गेली आहे. या घटनेची फिर्याद चेतन बापुजी चव्हाण (वय 28), ड्रायव्हर, राहणार गाळण,तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांनी केली आहे.


फिर्यादीच्या माहितीनुसार, 20 रोजी रात्री 11:30 वाजता त्यांनी पाल गावाजवळील खरगोन रोडवरील पार्किंगमध्ये त्यांची क्रुझर गाडी (क्र. MH-46 AL-0835) लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने गाडी चोरी करून नेली.
चोरीस गेलेल्या गाडीची किंमत 3,00,000/- रुपये असून फिर्यादीच्या तक्रारीवरून रावेर पोलिस स्टेशनमध्ये कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ जगदीश पाटील करीत आहेत.


