Home Cities पारोळा पारोळा येथील कृषी केंद्रात जादा दराने बियाण्यांची विक्री; कारवाईची मागणी!

पारोळा येथील कृषी केंद्रात जादा दराने बियाण्यांची विक्री; कारवाईची मागणी!


पारोळा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यात बियाण्यांची जादा दराने विक्री होत असल्याने दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटनेने निवेदन दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील शेतकरी नवल हिलाल पारधी यांना महाबीजचे उडीदाचे बियाणे लागत असल्याने त्यांनी विश्वस्वरूप कृषी केंद्र तलाव गल्ली घेण्यासाठी गेले असता त्यांनी जादा दराने बियाण्यांची देण्यात आले. दरम्यान, महाबीज बियाण्यांची जादा दराने विक्री केल्याने दुकानादारावर कायदेशीर कारवाइ्र करत त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणीचे तक्रारी अर्ज जळगाव तालुका पंचायत समितीला देण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा, आठ दिवसांच्या कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.


Protected Content

Play sound