Home Cities एरंडोल भालगाव येथे यात्रोत्सव उत्साहात

भालगाव येथे यात्रोत्सव उत्साहात

0
81


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भालगांव येथे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे सालाबादप्रमाणे यंदा यात्रोत्सव पार पडला असून भालगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज मराठे यांच्या तर्फे दर्शनासाठी आलेल्या दोन किंटल साबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले

भालगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी दोन्ही तालुक्यातील असंख्य भाविक दिंडी काढून पायी चालत येतात. तर काही भाविक वारकरी वेषात टाळ-मृदुंगाच्या व हरिनाम च्या गजरा येतात. या यात्रेत छोटी मोठी खेळण्याची दुकाने तसेच छोटे पाळणे देखील येतात. यामुळे लहानगे भाविक याचा आनंद घेतात दरम्यान आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री सतिश पाटील, नाना पोपट पाटील, डॉ. हर्षल माने,वासुदेव पाटील आदी नेत्यांनी दर्शनासाठी हजेरी लावली. तर सायंकाळी गावातून पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडावा म्हणून मंदीर प्रशस्त व ग्रामपंचायत सरपंच सदस्य सह गावकर्‍यांनी मेहनत घेतली.


Protected Content

Play sound