संतनगरी शेगाव मध्ये लक्षावधी भाविकांची मांदियाळी !

शेगाव-अमोल सराफ | आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर आज संतनगर शेगाव येथे लक्षावधी भाविकांची मांदियाळी जमली असून जय हरी विठ्ठल व गण गण गणात बोतेचा गजर झाला आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये आज आषाढी एकादशीच्या पर्वावर मोठ्या संख्येने वैष्णवांचा मेळा जमला आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्री पालखीचे गुरुवार दशमी नित्यनेमाने परिक्रमे आषाढी एकादशीची सायंकाळी श्री पालखी परिक्रमा राहील. ही पालखी परिक्रमा श्री संस्थांच्या परिसरातील सेवाधारी निवास, श्री बाळाभाऊ महाराज मंदिर, श्री महाप्रसादाला,श्री लायब्ररी जवळून पश्चिम द्वारातून श्री मंदिरामध्ये पुन्हा पालखीचे मंदिरात आगमन होईल.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊ न शकलेले भाविक विदर्भ पंढरी असलेल्या संत नगरीत आपली हजेरी लावतात. त्याच धर्तीवर शेकडो भाविक आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संतनगरीत दाखल होत असतात. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नित्याने गुरुवारी व दशमीला निघणारी श्रीपालखी परिक्रमा पार पडली. पूर्वसंध्येलाच श्रींच्या रजत मुखवट्याचे भाविकांनी दर्शन घेतले .
शेकडो भाविकांनी रात्रीपासून श्री चरणी नतमस्तक होऊन श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले. रात्री बारा वाजे नंतर देखील भाविकांकरिता दर्शन व्हावे याकरिता दर्शन बारी खुली होती व भाविकांनी एकाच गर्दी केली होती. एकंदरीत आता आषाढी एकादशीची औचित साधून रात्रभर भाविकांनी पायी प्रवास करत संतनगरी दाखल झाले. या भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाची सोय व्हावी यासाठी श्री संस्थान कडून समाधी दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले करण्यात आले. श्रींच्या रूपात विठुरायाचे दर्शन भाविक घेतात.

आषाढी एकादशीच्या पूर्व संदेला संतनगरी हजारो भाविकांचा जनसाकार उसळल्याने १६ जुलै रोजी श्रींचे मंदिर रात्रभर सुरू होते .तरी गर्दी आज आषाढी एकादशीला म्हणजे १७ जुलै रोजी वाढणार असल्याने श्रींचे मंदिर रात्री गर्दी कमी होईपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आहे. तसेच रेल्वे बस व खाजगी वाहनाने देखील वाहनांनी संतनगरीकडे वाटचाल सुरू आहे.

भाविकांच्या वतीने ठिकठिकाणी फराळ व चहा आवाहन देण्यात येत आहे .श्रींच्या ऋषीपंचमी श्रीराम नवमी व प्रगट दिनाला भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असतेच. तर आज देखील आषाढी एकादशीला देखील अशीच गर्दी कायम राहत आहे.

काल रात्रीपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुख्यता घाटाखाली खामगाव शेगाव नांदुरा जळगाव जामोद या भागात पाऊस सतत पडत आहे पण तरीदेखील महिला आणि पुरुष मंडळी पाई चालत श्रींच्या दर्शनाकरता खामगाव ते शेगाव या १६ किलोमीटर दिंडी मार्गावर श्री नामाचा हरी विठ्ठलाचा गजाननाचा जप करत शेगावात दाखल होतानाचे चित्र दिसून येत आहे.

Protected Content