प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात शांतता नांदावी, ओबीसींचे आरक्षण कायम रहावे, ही प्रमुख मागणी करत आज मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. येत्या 25 जुलैपासून ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सद्यस्थितीत मराठा ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झालेला आहे. मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करण्यास सरकार तयार नाही, तर दुसरीकडे ओबीसी संघटनांनी देखील जरांगे यांच्या मागणीला विरोध दर्शविला आहे.

या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे. २५ जुलै रोजी दादर चैत्यभूमी येथून ‘आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात होणार आहे. 26 जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा पुढे निघेल. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यातून ही यात्रा निघणार आहे. तसेच, 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. या मार्गावरती कॉर्नर बैठका देखील पार पडणार आहे.

Protected Content