पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात डबल डेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या खंडानंतर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवड्यापासून ही निविदा प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये २० डबलडेकरसह १०० ई-बसची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरात डबल डेकर बस धावणार असल्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. या डबल डेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या खंडानंतर मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांच्या सेवेत लवकरच डबल डेकर बस येणार आहे.
बस प्रत्यक्ष धावण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा अवगधी लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात 20 बस घेतल्या जातील. या बस ‘बीआरटी’ मार्गावरून धावणार नाहीत. नव्या बसला दोन जिने असतील. इलेक्ट्रिक व वातानुकूलित सेवा. उत्तम सस्पेन्शनमुळे पुणेकरांचा प्रवास आरामदायक होणार आहे. डिजिटल तिकिटाची बसमध्येच सुविधा असेल विशेष म्हणजे या बसचा ‘लुक’ लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा असेल. ७० प्रवाशांची क्षमता असलेल्या या बसमध्ये एकाच वेळी किमान शंभरपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये बसखरेदीचा निर्णय झाला होता. त्यास संचालक मंडळाने मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर सारे ठप्प झाले. मात्र आता या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.