खळबळजनक : परिवाराला मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी । धरणगाव शिवारातील एका शेतात अल्पवयीन मुलीला परिवाराला मारण्याची धमकी देवून दोघांकडून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीला आले आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शिवारातील शेतात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह वास्तव्याला आहे. सन २०२३च्या दिवाळीनंतर ४-५ दिवसांनी पीडित मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिला चॉकलेटची गोळी सारखी काहीतरी गोळी देऊन तिला संशयित आरोपी प्रवीण छत्र्या बारेला रा. कानळदा ता. जि.जळगाव हा तिच्यावर शेतात जाऊन अत्याचार करत होता. दरम्यान त्याने तिला कोणाला काही सांगितले तर जीवेठार मारेन अशी धमकी दिली होती. ही बाब पन्नालाल मराठे रा. धरणगाव याला समजले, त्याने देखील मुलीला एकांतात गाठून प्रवीण बारेला यांनी केलेले अत्याचाराबाबत बाहेर सर्वांना सांगेन अशी धमकी देऊन त्याने देखील तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. दरम्यान तिचे आई-वडिलांसह पीडितेने तातडीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी ९ जुलै रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी प्रवीण छत्र्या बारेला रा.कानळदा ता.जि.जळगाव आणि पन्नालाल मराठे रा. धरणगाव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पन्नालाल मराठे याला अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहे.

Protected Content