मद्यपान करून वाहन चालवले तर कायमचे लायसन्स होणार रद्द

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ड्रंक अँड ड्राईव्हच्या वाढत्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी पुणे पोलिसांनी आता मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात गेल्या ६ महिन्यांत १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. आतापर्यंत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर केवळ खटले दाखल करण्यात येत होते.

पण यापुढे कुणी असे करताना आढळले तर प्रथम त्याचा ड्रायव्हिंग परवाणा ३ महिन्यांसाठी रद्द केला जाईल. पण त्यानंतर पुन्हा हा व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवताना आढळला तर त्याचा परवाना ६ महिने व अखेर तिसऱ्यांदा कायमस्वरुपी रद्द केला जाईल, अशी माहिती पुणे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

Protected Content