अमेय सराफ विद्युत अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात प्रथम

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्षीय परीक्षेत विद्युत अभियांत्रिकी मध्ये अमेय अमोल सराफ याने ९१.१८ टक्के गुण घेऊन प्रथम वर्षात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे गणित १ व गणित २ या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे.

या यशाबद्दल शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य समीर प्रभुणे सर यांनी अमेय सराफ याचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी देखील दूरध्वनीवरून अमेय चे कौतुक केले आहे व पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या आहे. अमेय आपल्या यशाचे श्रेय आपल्या कॉलेजमधील प्राचार्य व संबंधित सर्व शिक्षक वृंदांना देतो.

Protected Content