कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी प्रीतम पाटील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. डॉ. किरवले यांचा बंगला खरेदी करण्याच्या व्यवहारातून आरोपीशी वाद झाला होता. त्या वादातून त्यांच्या राहात्या घरी ३ मार्च २०१७ रोजी त्याचा खून झाला होता. डॉ. किरवले म्हाडा कॉलनीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी प्रितम गणपती वाटील यांचे घर आहे. डॉ. किरवले व आरोपी प्रितम पाटील यांच्यामध्ये बंगला खरेदी करण्याबाबतचा व्यवाहार झाला होता. या व्यवहाराचे ३ मार्च २०१७ रोजी संचकारपत्र नोंदणी करण्यात आले होते. त्याच दिवशी आरोपी व डॉ. किरवले यांच्यात व्यवहाराबाबत वाद झाला. त्यामुळे प्रितम पाटील याने चिडून जाउन किरवले यांना ठार मारण्याचा इरादा केला.
शाहूपूरीतील दुकानातून त्याने कोयता खरेदी केला. ३ मार्च २०१७ रोजी प्रितम याने किरवले यांच्या बंगल्यात प्रवेश करून संचकारपत्राची मागणी केली. मात्र त्यानंतर ही संचकारपत्र न मिळाल्याने डॉ. किरवले यांच्या कपाळावर, मानेवर गळयावर वार केले, या हल्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान प्रितम याने मंगला गणपती पाटील यांना घटनास्तळी पडलेला कोयता व पिशवी घेउन जाण्यास सांगीतले. मंगला पाटीलने गुन्हयातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या दोघांवर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र दरम्यान मंगल पाटील यांचे निधन झाले.पुरोगामी तसेच आंबेडकरी चळवळीतील आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून डॉ. किरवले यांची ओळख होती. त्यांच्या हत्येच्या वृत्ताने त्यांना माननारयांमध्ये संतापाची लाट पसरली. हत्येचे हे वृत्त समजताच मोठया प्रमाणात जमा झालेल्या संतप्त जमावाने संशयित हल्लेखोराच्या घराची तोडफोड त्यावेळी केली होती.