पोलिसांना चकवा देऊन पळ काढणाऱ्या संशयीताला शिताफिने अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ९ वर्षीय चिमुकलीला शेतात घेवून जात तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या समाधान उर्फ सोमा अभिमन भिल (वय २४, रा. आडळसे, ता. भडगाव) याला मेहरुणबारे पोलिसांनी अटक केली होती. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते. परंतु तो पोलिसांना गुंगारा देत जिल्हा रुग्णालयातून पसार झाल्याची घटना गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्य सुमारास घडली. पसार झालेल्या संशयित आला गांधी उद्यान परिसरातून सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे.

बहाळ तालुक्यातील खेडगाव बहाळ रस्त्यालगत असलेल्या शेतात ९ वर्षीय चिमुकलीला चप्पल घेवून देण्याचे अमिष दाखवून समाधान उर्फ सोमा भिल हा घेवून गेला. त्याने शेतात त्या चिमुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु चिमुकलीने त्या नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत शेतात काम करणाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी संशयित समाधान उर्फ सोमा भिल हा तेथून पसार झाला. परंतु ग्रामस्थांनी त्या संशयिताचा पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत मेहरुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोक्सोतंर्गत अटक केलेल्या गुन्ह्यात संशयित समाधान उर्फ सोमा भिल याच्या वैद्यकीय चाचणीसाठी त्याला गुरुवारी 4 जुलै रोजी दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात आणले. परंतु याठिकाणी चार वाजेच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो पसार झाला होता. घटनेची माहिती पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात होता. संशयित समाधान उर्फ सोमा भिल हा गांधी उद्यान परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, किरण चौधरी यांना मिळाली. त्यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेत पसार झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

Protected Content